Latest

सांगलीतले ‘ते’ सांबर अखेर वनविभागाकडून रेस्‍क्‍यू

निलेश पोतदार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा गेल्या चार दिवसांपासून सांगलीत आलेले सांबर वनविभागाने काल (मंगळवार) रात्री भारत सूतगिरणीच्या परिसरातून रेस्‍क्‍यू केले. शुक्रवारी पहाटे मिरज एमआयडीसी परिसरात सांबर दिसून आले होते. यानंतर त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्‍न सुरू होते.

गेल्या चार दिवसांपासून कुपवाड येथील भारत सूतगिरणी परिसरात सांबर दिसून येत होते. चारही बाजूने कंपाऊंड असल्याने त्याला तेथून बाहेर पडता आले नाही. तेथेच त्याच्या चारा, पाण्याची सोय वनविभागाने केली होती. त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र आठ फूट जाळी वरून उडी मारून या सांबराने धूम ठोकली. आज (बुधवार) पहाटे त्याला वनविभाग आणि डब्लू आर सी टीमने सुरक्षितरित्या रेस्क्यू केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT