Latest

Tiger 3 Advance Booking : टायगरचा रिलीजपूर्वी धुमाकूळ, दिवाळीपूर्वी तब्बल १५ कोटींचा गल्ला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर ३ रिलीज होण्यास एक दिवस अवकाश असताना ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. (Tiger 3 Advance Booking) टायगर-३ ने दिवाळीपूर्वी धुमाकूळ घालत तब्बल १५ कोटींचा गल्ला जमवला आहे. जबरदस्त ॲक्शन सीन्ससोबत या चित्रपटातून सलमान खान पडद्यावर धुमाकूळ घालायला येत आहे. यामध्ये कॅटरिना कैफ झोयाच्या भूमिकेत आहे. तसेच इमारन हाशमीचीही महत्त्वाची भूमिका असेल. (Tiger 3 Advance Booking)

संबंधित बातम्या – 

१२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होईल. रविवारी चित्रपटाचे ग्रँड ओपनिंग होईल, असे म्हटले जात आहे. बिग बजेटवाला हा चित्रपट सलमान खान आपल्या फॅन्ससाठी दिवाळी गिफ्ट म्हणून घेऊन येत आहे. तत्पुर्वी ॲडव्हान्स बुकिंगद्वारे १५ कोटी या चित्रपटाने कमावले आहेत.पूजा हेगडे-सलमानचा किसी का भाई किसी का जान चित्रपटाने म्हणावे तसे यश मिळवले नाही. आता टायगर ३ बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार, याकडे उत्सुकता लागून राहिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT