Latest

म्हणून ५५ वर्षीय सलमान खान लग्न करत नाहीये ! महेश मांजरेकरांनी सुद्धा केला होता खुलासा

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन

नुकतच अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' हा सिनेमा रिलीज झाला आहे. पहिल्‍यांदाच आयुष शर्मा हा सलमान खान सोबत स्‍क्रीनवर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्‍यान आयुष शर्माने सलमान खान बद्दलच्या पर्सनल लाईफ बद्दल काही गोष्‍टी उघड केल्‍या. यावेळी त्‍याला सलमान खानच्या लग्‍नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

एक न्यूज पोर्टलशी बोलताना आयुष शर्माने सांगितले की, सलमान खानशी मी लग्‍नाबद्दल जास्‍त बोलत नाही. सलमान खान ज्‍या पध्दतीने आयुष्‍य जगत आहे, काम करत आहे, त्‍यावरून लक्षात येते की, सलमान खानकडे लग्‍नासाठी वेळ नाही. आयुष म्‍हणाला मला असे वाटते की, ते जसे आहेत तसेच खुश आहेत. ते याचा निर्णय स्‍वत:च घेतील.

आयुषला सलमान खानच्या लाईफस्‍टाईल बद्दल विचारण्यात आले. त्‍यावर सलमान हे अत्‍यंत साधेपणाने राहतात. जर तुम्‍ही सलमान खानचा फोन पाहिला तर ते २ ते ३ वर्षे जुना फोन वापरतात. त्‍यांना नवीन गॅजेट्स वापरण्यामध्ये रस नाही. सलमानला नवीन कार, कपडे यासारख्या गोष्‍टींमध्ये इंट्रेस्‍ट नसल्‍याचे त्‍याने सांगितले.

आयुष म्‍हणाला फक्‍त एक गोष्‍ट आहे ज्‍यात सलमान खानला आवड आहे ती म्‍हणजे चित्रपट. सलमानला २ ते ३ तासांसाठी एकटे सोडले तर तो आपला वेळ चित्रपट पाहण्यात खर्च करतो. या आधी एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सलमान खान एकटा असताना खूप साध्या पध्दतीने राहतो. आता त्‍याने लग्‍न करायला हवे अशी प्रतिक्रिया दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT