Latest

Saket Court Firing: दिल्लीतील साकेत कोर्टात गोळीबार; महिला जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात आज (दि.२१) सकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारा दरम्यान बंदुकीतून चार राऊंड फायर (Saket Court Firing) करण्यात आले. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून दिल्ली  पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जखमी महिला आज शुक्रवारी (दि.२१) एका खटल्यासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात पोहोचली होती. ती एका खटल्यात साक्षीदार आहे. या दरम्यान अचानक झालेल्या गोळीबारात (Saket Court Firing)  तिला गोळी लागली. सध्या या जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालयात वकिलाच्या वेशात आलेल्या शूटरने गोळीबार (Saket Court Firing)  केला. त्याने न्यायालयाच्या आवारातच बंदुकीतून चार राऊंड फायर केले. या गोळीबारात सदर महिलेला एक गोळी लागून, ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली साकेत कोर्टात शूटरने ४ राऊंड फायर केले. त्यामध्ये महिलेला ३ गोळ्या आणि लेखकाला एक गोळी लागली. दोघांची प्रकृती स्थिर असून दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. आम्ही सुरक्षा  मजबूत केली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिस डीसीपी दक्षिण चंदन चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT