Latest

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा भाषांतरसाठी पुरस्कार जाहीर

backup backup

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : येथील साहित्यिका, अनुवादक सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा भाषांतरसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोनाली नवांगुळ यांनी अनुवादीत केलेल्या मध्यरात्रीचे तास या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमीचे भाषांतरासाठीचे सन २०२०चे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. साहित्य आकादमीचा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील मोठा सन्मान मानला जातो.

साहित्य अकादमीच्या कार्यकारी समितीची बैठक अध्यक्ष चंद्रशेखर कंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात हे देशभरातील २४ पुस्तकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. तामिळ भाषेतील इंद्रम जम्मकलीन कथई या कादंबरीचा हा अनुवाद आहे.

५० हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोनाली यांनी आतापर्यंत ७ पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील ४ अनुवाद आहेत. अनुवादामध्ये 'मध्यरात्रीनंतरचे तास', 'ड्रीमरनर,' 'वरदान रागाचे', 'वारसा प्रेमा'चा ही चार पुस्तकं आहेत. याशिवाय स्वच्छंद हे ललित लेखन, जॉयस्टिक हा गोष्टींचा संग्रह आणि मेधा पाटकर हे मुलांसाठीचं माहितीपर पुस्तक यांचा समावेश आहे.

यापूर्वी रणजीत देसाई (स्वामी), राजन गवस (तणकट) यांना साहित्य अकादमीचे मुख्य पुरस्कार, तर नवनाथ गोरे (फेसाटी) यांना युवा साहित्य अकादमी तर सलीम मुल्ला (जंगल खजिन्याच्या गोष्टी) यांना बाल साहित्य अकादमी असे पुरस्कार मिळाले आहेत.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="39600"]

SCROLL FOR NEXT