Latest

Russia Ukraine War Updates : युक्रेनवर हल्‍ला का केला? रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन यांनी सांगितले कारण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशिया-युक्रेन युद्धाचा आज ७७ वा दिवस आहे. आज रशिया विजय दिवस साजरा करत आहे. ( Russia Ukraine War Updates) यानिमित्त राष्‍ट्राला संबोधित राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादिमिर पुतीन यांनी युक्रेनवर रशियाने हल्‍ला का केला? याचा खुलासा केला आहे.

Russia Ukraine War Updates :आमच्‍यावर हल्‍ला हाेण्‍यापूर्वी आम्‍हीच हल्‍ला केला

यावेळी ब्‍लादिमीर पुतीन म्‍हणाले की, " नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनमधील (नाटो ) देशांपासून आमच्‍या देशाच्‍या सीमेला धोका होता. तसेच युरोपमधील क्रीमियासह काही देश रशियावर हल्‍ला करण्‍याच्‍या तयारीत होते. त्‍यामुळेच आम्‍हाला युक्रेनवर हल्‍ला करण्‍याशिवाय दुसरा पर्यायच शिल्‍लक नव्‍हता. रशियाचे लष्‍कर युक्रेनमध्‍ये आपल्‍याच मातृभूमीचे संरक्षण करत आहे. रशियाचे लष्‍कराने युरोपमधील देशांच्‍या धोरणांविरोधात योग्‍यवेळी आणि आवश्‍यक ती कारवाई केली आहे".

रशिया-युक्रेन रशिया-युक्रेन युद्धाचा आज ७७ दिवस आहे. अमेरिकेसह जी-७ आणि युरोपियन युनियने रशियावर आणखी निर्बंधाची व्‍याप्‍ती वाढवली आहे. रशियाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला धक्‍का देण्‍यासाठॅच मास्‍कोमधून तेल आयात बंद करणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केव्‍हापासून होईल, हे स्‍पष्‍ट केलेले नाही. दरम्‍यान, रशियाने सध्‍या युक्रेनची राजधानी कीव्‍हवरील हल्‍ले   थांबवले आहेत. आता विविध देशांचे राजदूत पुन्‍हा आपल्‍या कार्यालयात दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्‍या राजदूतांची टीम कीव्‍हमध्‍ये परतली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रूडो यांनीही दरवर्षी युक्रेन १.५ अब्‍ज डॉलरचे लष्‍कराचे साहित्‍य देणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. तसेच पुढील एक वर्षासाठी युक्रेनला होणार्‍या सर्व निर्यातीवरील करही हटविला आहे. अमेरिकेनंतर कॅनडाने युक्रेनला सर्वाधिक मदत केल्‍याचे युक्रेनच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT