Latest

Russian invasion of Ukraine : रशियानं युक्रेनवर ५०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, मृतदेहांचा खच पडण्याची भीती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Russian invasion of Ukraine : रशियाचे गेल्या १० दिवसांपासून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यात मोठी जीवितहानी झाली आहे. युक्रेनमधील दहा लाखांहून अधिक लोकांनी देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशियाने आठवडाभरात ५०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशिया दररोज विविध प्रकारची सुमारे दोन डझन क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागत आहे, असे वृत्त The Kyiv Independent या युक्रेनमधील मीडियाने पेंटागॉनच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, मोठ्या लष्करी ताफ्यासह रशियन सैन्य युक्रेनमधील अनेक मोठ्या शहरांवर हल्ले करत आहे.

"येत्या काही दिवसांत अधिक मृत्यू आणि विध्वंस होण्याची शक्यता आहे." अशी भिती नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटो आणि ब्रुसेल्समधील युरोपियन सहभागी देशांसोबत झालेल्या बैठकीत हीच चिंता व्यक्त केली आहे.

रशियाने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करून त्याचा ताबा घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. रशियाच्या गोळीबारामुळे अणुऊर्जा प्रकल्पावर आग लागली होती. पण ही आग विझवण्यात आली. त्यातून रेडिएशन लीक झालेला नसल्याने तूर्त धोका टळला आहे.

संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी, सध्याची परिस्थिती ही संपूर्ण युरोप आणि जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनसोबत युद्धाचा (Russia Ukraine War) रशियाची गुप्त योजना आता उघड झाली आहे. यातून रशियाच्या संपूर्ण कटाचा उलगडा होत असून केवळ १५ दिवसांत युक्रेनवर ताबा मिळवण्याची रशियाची योजना होती. तसेच युक्रेनवर हल्ल्याची परवानगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जानेवारी महिन्यातच दिली होती, असेही यातून समोर आले आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हाती रशियाच्या (Russian invasion of Ukraine) या योजनेबाबतचे काही दस्तऐवज लागले आहेत. रशियन बटालियनच्या टॅक्टिकल ग्रुपच्या युनिटमधील एका ट्रुपच्या प्लॅनिंगशी संबंधित हे दस्तऐवज आहेत. हे सर्व दस्तऐवज युक्रेनने फेसबुक हँडलवरून शेअर केले आहेत. या योजनेनुसार २० फेब्रुवारी ते ६ मार्च या काळात रशियन फौजा युक्रेनवर हल्ला करून युक्रेनवर ताबा मिळविणार होती. युक्रेन युद्धाची पटकथा मॉस्कोमध्ये १८ जानेवारी रोजीच लिहिली गेली होती. पुतीन यांनी त्याच दिवशी या बॅटल प्लॅनला मंजुरी दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT