Latest

PM KISAN योजनेविषयी महत्वाची अपडेट, ‘या’ नियमात केला बदल, जाणून घ्या अधिक

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा (PM KISAN) २ हजार रुपयांचा दहावा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०,९०० कोटी कोटी रुपये वर्ग करण्यात आले. आता मोदी सरकारने पीएम किसान योजनेत एक बदल केला आहे.

आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेटस स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसोन पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही. आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेटस पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेटस जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.

मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी 'पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन' या वेबसाईटवर करता येते.

#PMKisan या योजनेअंतर्गत जारी केलेली एकूण रक्कम सुमारे १.८ लाख कोटींवर पोहोचली आहे. PM-KISAN योजनेची घोषणा फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी होता.

पीएम किसान पोर्टलवर तुमचे स्टेटस कसे पहाल…

  • pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा
  • उजव्या बाजूला तुम्हाला Farmers Corner दिसेल
  • Farmers Corner वर क्लिक करा
  • आता पर्यायातून, Beneficiary Status वर क्लिक करा
  • तुमचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते तपशील द्यावा लागेल
  • तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे नाव यादीत असल्यास ते तुम्हाला सापडेल

PM KISAN वर तुमचे नाव मोबाईल ॲपद्वारे कसे तपासाल…

मोबाइल अॅपद्वारे तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तपशील पाहता येईल.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्याचे आयुष्य मोगरा शेतीने बनवले सुगंधित

SCROLL FOR NEXT