Latest

RRR टीमला ‘ऑस्कर सोहळ्यात’ ‘फ्री प्रवेश’ नाही ; सहभागी होण्यासाठी मोजली ‘इतकी मोठी’ रक्कम

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : 95 वा अकादमी पुरस्कार भारतासाठी ऐतिहासिक होता. यावेळी भारताने 'ऑस्कर'मध्ये दोन पुरस्कार मिळवले. 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला, तर 'आरआरआर' (RRR ) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाला. या सोनेरी क्षणाचा भाग होण्यासाठी केवळ संगीतकार-लेखकच नाही तर संपूर्ण 'आरआरआर' टीम या पुरस्कार सोहळ्याला उपस्‍थित होती.

मोफत तिकीट मिळाले फक्त संगीतकार आणि लेखकांना

'आरआरआर' गाण्याचे संगीतकार एमएम कीरवाणी 'नाटू नाटू' त्याचे लेखक चंद्र बोस, गायक कल भैरव-राहुल सिपलीगुंज, एसएस राजामौली, राम चरण आणि 'अवॉर्ड 2023'मध्ये ज्युनियर एनटीआर पत्नींसह पोहोचले होते. एका अहवालानुसार, 'ऑस्कर 2023' मध्ये चंद्रबोस, MM कीरावानी आणि त्यांच्या पत्नींसाठी फक्त तिकिटे मोफत होती, बाकीच्या टीमसाठी, राजामौली यांनी मोठी रक्कम भरून पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

राजामौली यांनी भरली एवढी मोठी रक्कम

एसएस राजामौली यांना 'आरआरआर'च्या टीमसोबत हा सोनेरी क्षण स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचा होता, असे बोलले जात आहे. यासाठी राजामौली यांनी 20 लाख रुपये प्रति तिकिट विकत घेतले. त्यानंतर समारंभाला उपस्थित राहून ऐतिहासिक सोहळा सर्व टीमसोबत पाहिला.

त्यामुळे 'ऑस्कर 2023'वर टीका झाली

'ऑस्कर 2023' कार्यक्रमात 'RRR' दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या टीमला शेवटची सीट दिली होती. त्‍यामूळे लोक व्यवस्थापनावर प्रचंड संतापले. तसेच 'आरआरआर'च्या टीमचा हा अपमान केला असे म्हटले.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT