Latest

Congress : रायगड जिल्ह्यातील शेकडो रिपाई कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो, सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो, हा विश्वास दृढ होत आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमेय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे पटोले यांनी पक्षात स्वागत केले.

देशातील वातावरण बिघडवणाऱ्या शक्तींना चोख उत्तर देत काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवण्यासाठी काम करा. हुकूमशाहीशक्ती विरोधात राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे लढा देत आहेत. या लढाईत सहभागी होत देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टीचे उलवेचे अध्यक्ष महेश जंगले, अमित पवार, राम पवार, महेंद्र मोहिते, राजू मनवर, श्याम गुडदे, रघुनाथ भगत, दिनेश वाघमारे, संजय गावंड, लक्ष्मण चौगुले, संदीप भालेराव, दिपक पट्टेबादूर, विलास कांबळे, संतोष सरकटे, दत्तात्रय करे, मारोती जाधव, कविता झटाते, सविता काळे, पलक काळे, परिनिती झटाले, शुभांगी नकटे, काजल रावत, कलावती कौर, निशा मोरे, कृष्णा कौर, माधुरी जैस्वाल, निशा राठोड, समशिदा शेख, प्रियंका राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT