मंचर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नसल्याने त्यांच्याकडून शेतकर्यांच्या उन्नतीसाठी अपेक्षा धरण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकूमशाही कारभाराची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (दि. 23) खिल्ली उडविली. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाताना मंचर (ता. आंबेगाव) येथे पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शेतकर्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे.
सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी 3 ते 12 सप्टेंबर यादरम्यान राज्यात पदयात्रा काढली जाणार आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठविणार आहे, याची सखोल चौकशी व्हावी. सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. सरकार याबाबत गंभीर नाही.