Latest

Rook UGV : इस्त्राईलने बनविले ‘किलर रोबोट’, धोक्याच्या ठिकाणी घेणार सैनिकांची जागा

backup backup

अत्याधुनिक संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये हातखंडा असलेल्या इस्त्राईलने आता अशी रोबोट सेना तयार केली आहे, जी केवळ युद्धच नाही तर सीमेवरही जवानांची भूमिका पार पाडू शकते. इस्त्राईलची बहुचर्चित सुरक्षा कंपीम इब्लिट आणि रोबोटीम यांनी ही रोबोट सेना तयार केली आहे. रोक अनमॅंड ग्राऊंड व्हेइकल (Rook UGV) यांच्याद्वारे भूदलातील सैनिकांची भूमिका घेण्यासही मदत मिळू शकते.

इस्त्राईल कंपन्यांचा दावा आहे की, हे रोबोट्स (Rook UGV) सीमेवर सैनिकांची जागादेखील घेऊ शकते. सीमेवर जास्त धोकादायक ठिकाणी सैनिकांना जाणं अशक्य आहे, तिथे हे हे रोबोट पाठवून निश्चित उद्दिष्ट गाठता येते. या रोबोटकडे खतरनाक हत्यारे आहेत आणि पापणी लवण्याच्या आतमध्ये शत्रुंना यमदसनी धाडू शकते. अशा रोबोट सेनेच्या खास गोष्टी काय आहेत ते पाहू…

आकाशातील हलचाली जमिनीवरून करू शकतो

रोबोटीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलाज लेवी म्हणतात की, "हे मशीन माणसांसारखे काम करते. माणसांसोबत जेस काम करतो, त्याचप्रमाणे त्या मशीन्ससोबत युद्ध लढू शकतो. युद्धात जेव्हा आपण आकाशातील ड्रोन आणि हवाई रोबोट यांच्याद्वारे जे काम करत करतो, तेच काम आपण युजीवी रोबोटद्वारे जमिनीवरूनही करू शकतो. या रोक सिस्टमला PROBOT UGV सिस्टमच्या धर्तीवर विकसित करण्यात आलं आहे. विशेष बाब की हे रोक एक कनेक्टेडल सिस्टम आहे."

ताशी ३० किलोमीटरने चालणाऱ्या 'रोक'ची किंमत इतकी…

या रोक रोबोटमध्ये माणसांसारखे निर्णय घेण्याची क्षमता आहे. कारण, त्याची सिस्टम ही आर्टिफिशल इंटेलिजेन्सद्वारे करण्यात आलं आहे. युद्धावेळी त्यात काही बिघाड झाला की, सैनिक त्याला त्वरीत दुरुस्त करू शकतात. या रोकचे वजन १२०० किलो असून त्याच्या वजनाइतका भार ते पेलू शकते. खराब रस्ते आणि पर्वतांवरून हे रोबोट अगदी व्यवस्थितपणे चालू शकते. जमिनीपासून दोन फूट उंच आणि ताशी ३० किलोमीटर वेगाने हे रोबोट चालू शकते. याच्या बॅटरीचे वजन ४० किलो इतके आहे आणि ती ८ तासांपर्यंत चालू शकते. या रोक रोबोटला केवळ एकच माणूस चालवू शकतो. याची किंमत १५०, ००० लाख डाॅलरपासून ३००,००० लाख डाॅलरपर्यंत आहे.

वाळवंट असो की, बर्फाळ प्रदेश दोन्ही ठिकाणी चालणार…

हा रोबोट दिवस असो की, रात्र… वाळवंट असो की, बर्फाळ प्रदेश कुठेही अगदी सहजपणे चालते. यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सेन्साॅरने आपल्या सैनिकांना ओळखून युद्धात त्यांच्या मागून जातात. खराब रस्ते, गवत, दगड-गोटे ओळखण्याची क्षमता यामध्ये आहे. इतकंत नाही तर एखाद्या अपघातापासूनही ते वाचू शकतात. कंपन्यांचा असा दावा आहे की, रोकचा वापर सैनिकांसाठी माल पोहोचविणे, अंतर्गत माहिती पोहोचविणे, ड्रोन पाठविणे आणि रिमोट शस्त्रं म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो. या कंपनीने आतापर्यंत २० देशांना हे खतरनाक रोबोट विक्री केली आहे,

हे वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT