Latest

India vs Sri Lanka 1st ODI : शनाका ९८ धावांवर झाला होता आउट, तरीही अपील का मागे घेतली? कर्णधार रोहितने दिले उत्तर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि श्रीलंका यांच्‍यात पहिल्‍या वनडे सामन्‍यात ९८ धावांवर खेळणार्‍या दासुन शनाकाविरुद्धचे मंकडिंग अपील  कर्णधार रोहित शर्माने मागे घेतले माघारी घेतली. रोहित शर्माच्‍या या खिळाडूवृत्तीवर क्रिकेट विश्‍वासह सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ( India vs Sri Lanka 1st ODI ) आपल्‍या या कृतीबाबत रोहित शर्माने सामन्‍यानंतर खुलासा केला.

सामन्‍यावेळी नेमकं काय घडलं ?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील  पहिल्या सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३७३ धावा केल्या. या सामन्‍यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने एकाकी झुंज दिली. सामन्यातील शेवटच्या षटकावेणी शनाका ९८ धावांवर नॉन स्ट्राईकवर उभा होता. या वेळी शमीने गोलंदाजी करण्यापूर्वीच शनाका क्रीज सोडून पुढे गेला.शमीने त्याला धावबाद केले आणि पंचांकडे मंकडिंगचे अपील केली. मैदानावरील पंचाने धावबाद तपासण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तेव्हा भारतीय कर्णधार रोहित याने शमीने केलेले अपील मागे घेतले. यानंतर शनाकाला स्ट्राइक मिळाला आणि त्याने आपले शतक पूर्ण केले.

India vs Sri Lanka 1st ODI : काय म्‍हणाला रोहित शर्मा ?

मंकडिंगचे अपील मागे घेण्‍याच्‍या निर्णयाबाबत रोहित शर्माने सांगितले की, "मला दासून शनाका याला अशा पद्धतीने बाद करायचे नव्हते. मला माहित नव्हते की, शमीने पंचांकडे मंकडिंग अपील केले आहे. यावेळी शनाका ९८ धावांवर फलंदाजी करत होता. या सामन्‍यात त्‍याने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. आम्ही त्याला अशा प्रकारे ( मंकडिंगने) आऊट करणे मला योग्‍य वाटले नाही. आम्हाला त्‍याला अशा प्रकारे बाद करायचे नव्‍हते. त्‍याने उत्‍कृष्‍ट फलंदाजी केली. अशा प्रकारे बाद करुन आम्ही त्याचे श्रेय हिरावून घेऊ शकत नव्‍हतो ."

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने सामन्‍यात शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. त्याने 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या, पण श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही. भारताने हा सामना 67 धावांनी जिंकला.

काय आहे 'मंकडिंग' आउट ?

नॉन स्‍ट्राइकवर असलेल्‍या फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्‍यापूर्वीच क्रिज सोडल तर गोलंदाज संबंधित फलंदाजाला धावचीत करतो. या  पद्‍धतीने मंकडिंग आउट म्‍हणतात. यापूर्वी क्रिकेटमधील नियम ४१ नुसार अशा प्रकारे फलंदाजास बाद करणे खिळाडूवृतीविरोधात  मानले जात असे. मात्र मार्च २०२२ मध्‍ये क्रिकेट खेळाचे नियम ठरविणार्‍या मेरिलबोन क्रिकेट क्‍लबने (एसीसी ) नियम ३८ नुसार अशा प्रकारे बाद करणे धावचीत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले हेते . हा नियम १ ऑक्‍टोबर २०२२ पासून लागू करण्‍यात आला आहे.

मंकडिंग हे नाव कसे पडले?

१९४७ मध्‍ये भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील एका सामन्‍यात भारताच्‍या विनू मंकड यांनी गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडून पुढे गेलेल्‍या बिल ब्राऊनला रन आऊट केले होते. तेव्‍हापासून अशा पद्‍धतीने फलंदाजाला आऊट केल्‍यास मंकडिंग असे संबोधले गेले. या वेळी अशा प्रकारे आउट केल्‍याने ऑस्‍ट्रेलियात भारतीय संघावर मोठी टीकाही झाली होती. अशा प्रकारे फलंदाजास आऊट करणे खिळाडूवृती नाही, असे म्‍हटलं गेले होते. मात्र आता मंकडिंग आउट नियम झाला आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT