Latest

Ajit Pawar Latest News :अजित पवार पक्ष सोडून गेल्याने खूप वाईट वाटले : रोहित पवार

अविनाश सुतार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात काल जे काही घडलं, त्यामुळे शरद पवार थांबलेले नाहीत. शरद पवार थांबणारा नेता नाही. शरद पवार यांनी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उसळला, हे लोकांचे प्रेम आहे. या ताकदीपेक्षा मोठी ताकद कुठलीही होऊ शकत नाही. पुढे आपण पाहाल साहेबांची आणि लोकांची ताकद केवढी मोठी आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. सातारा येथील विश्रामगृहात त्यांनी आज (दि. ३) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांना विनंती करू शकतो. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, अशा परिस्थितीत मी त्यांना विनंतीशिवाय काही करू शकत नाही. ते पक्ष सोडून गेल्याने मनाला खूप वाईट वाटले, असे सांगून भाजपला आम्ही विरोध केला होता, आणि त्यांच्याबरोबरच जाणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. आज जसा जनसमुदाय उसळला तसाच जनसमुदाय शरद पवारांच्या मागे कायमस्वरूपी राहणार आहे. जे आमदार काल मुंबईमध्ये दिसले. त्यांना वेगळं काहीतरी सांगितलं गेलं होतं. अध्यक्षांच्या बाबतीत चर्चा करायचे आहे, असे सांगून सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावले होते. म्हणून त्या आमदारांनी विचार सोडले. असे आपल्याला म्हणता येणार नाही. ज्यांना लोकांमधून निवडून यायचे आहे, ते सर्व आमदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत माघारी येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही आमदारांना फसवून नेले नव्हते. कारण देऊनच त्या ठिकाणी बोलावले होते. सह्या घेतल्यानंतर लगेचच राजभवनामध्ये नेण्यात आले. ज्यांना शरद पवारांनी विविध पदे दिली. त्यांना मोठे केले, हे सगळे भोगून आज पवारांना धोका देऊन सत्तेत गेले आहेत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT