Latest

Rinku Rajguru : आर्चे किती बारीक झाली आहे जरा खात पीत जा ?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सैराटमधील जाडजूड आर्ची सर्वांनाच भावली. पण, नंतर तिने काही चित्रपटांसाठी आपले वजन कमी केले. आतादेखील तिचं बदललेलं रुपडं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (Rinku Rajguru ) पूर्वीपेक्षा रिंकू दिसायला स्लिम आणि सुंदर झालीय. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप सुंदर फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावणाऱ्या आर्चीने खूप कमी वेळेत मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले. नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून ती रातोरात लोकप्रिय झाली. कागर, झुंड, मेकअप अशा चित्रपटांमध्ये तिने अभिनय साकारला आहे. (Rinku Rajguru )

रिंकू नेहमीच स्टायलिश दिसतेय. आताही तिने गुलाबी रंगाच्या वेस्टर्न लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचे शॉर्ट हेअरदेखील दिसतात. लाईट मेकअप आणि सुंदर हास्यामुळे तिला साजशृंगाराची फारशी गरज नाहीये.

काही फोटो अपलोड करताना तिने लिहिलंय- Believe what your heart tells you, not what others say.??☀️
या फोटो पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला कमेंट बॉक्समध्ये भरभरून कमेंट्स केले आहेत. एका युजरने लिहिलंय-आर्चे किती बारीक झाली आहे जरा खात पीत जाना..??

रिंकूच्या फोटोंवर अन्य युजर्सनी काय उत्तर दिलंय पहा- Pretty ?, Beauty ???, Looking so beautiful pic Rinku mam ?, Hhee archii…?❤️, तू जर टायटॅनिक जहाज वर असली असतीस तर टायटॅनिक जहाज बुडतच नव्हता तुला पाहून तो बर्फाचा स्टोन विरघळून जात होता …..?️???…..??❤️, Hi madam namaskar aap to Sari mein bahut acchi Lagti Ho❤️. असे कमेंट्स देत युजर्सनी खूप सारे लव्हली, हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT