पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई हायकोर्टासमोर ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रॉपर्टीच्या केसच्या कारणातून हे पाऊल उचलत आत्महत्येचा या व्यक्तीने प्रयत्न केल्याचे कारण समोर आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती माजी सेवानिवृत्त सैनिक असल्याचे समजत आहे.