Latest

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार : शरद पवारांची मोठी घोषणा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा (NCP) नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आज (दि. २) केले.

यावेळी पवार (Sharad Pawar Resigns) म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांचा सभागृहातच निर्णयाला विरोध

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले.

Sharad Pawar Resigns : अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांशी चर्चा

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, या मागणीवर कार्यकर्ते ठाम राहिले. अजित पवार, जयंत पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा केली. यानंतर अजित पवार म्हणाले की, याबाबत एक समिती स्थापन केली जाईल, यामध्ये पक्षाती ज्येष्ठ नेते असतील.या समितीचा निर्णय शरद पवारांना मान्य असेल, असे स्पष्ट करत सर्वांनी शांत राहावे. तर बैठकीत सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आताच निर्णय जाहीर करावा,अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही, आम्ही येथून हालणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

जयंत पाटील यांना अश्रू अनावर

शरद पवार बाजूला गेले, तर आम्ही कोणाला घेऊन मतदारांसमोर जाणार, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाने ओळखला जातो. त्यांना निवृत्त स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केले. यावेळी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबणार असेल. तर आम्हीही थांबतो, असा निर्वाणीचा इशाराही पाटील यांनी दिला. यावेळी भावूक झालेल्या जयंत पाटील यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना धीर दिला.

दरम्यान, मी फक्त पदावरून बाजूला झालो आहे. मी तुमच्या सोबत कायम आहे. यापुढे ही सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार आहे. सर्व कार्यक्रमांना मी तुमच्यासोबत हजर असेन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. परंतु नेते आणि कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT