नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत देवळा व निफाडचे पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. तर दिंडोरी अनूसूचित जमाती (सर्वसाधारण) कळवण, पेठ व सुरगाण्यात खुला प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षण सोडत निघाली आहे.
राज्यात नगरपंचायतींच्या रणसंग्रामानंतर सर्वांच्याच नजरा नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. त्यानूसार गुरूवारी (दि.27) मुंबईत नगरविकास विभागातर्फे राज्यातील 139 नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेेश पाठक यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 109, अनूसूचित जातीसाठी 17 तर अनूसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव ठेवण्यात आली. आरक्षण सोडतीवेळी देवळा व निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी सुटले आहे. तर दिंडोरीचे पद हे अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) राखीव झाले. कळवण, पेठ व सुरगाणा येथील पदे ही खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारणचे आरक्षण निश्चित झाले आहे.
राज्यातील नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून, खुल्या प्रवर्गासाठी 109, अनुसूचित जातीसाठी 17, तर अनुसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव झाली आहेत.नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपदाच्या 17 जागा आरक्षित झाल्या असून, त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला), तर 8 जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमातील सुधारणेनुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधूनच निवडले जात असून, त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.