नोटा उधळत वधू-वराच्या अंगावर पडला मित्र आणि त्यानंतर…. | पुढारी

नोटा उधळत वधू-वराच्या अंगावर पडला मित्र आणि त्यानंतर....

पुढारी ऑनलाईन डेस्क

लग्नात नवरदेवाच्या मित्राने धिंगाणा नाही घातला तर नवलचं. इंटरनेट व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओंमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्टेज वर बसलेले असताना त्यांच्यावर मित्र नोटा उधळत आहे. पण यामुळे नवरदेवाला राग आला आणि नवरदेवाने काहीही न पाहता या मित्राला धडा शिकवला.

हा व्हिडिओ फार मजेदार आहे. तुम्हालाही फार आवडेल. व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत. आणि त्यांच्या समोर उभारलेले दोन मित्र नोटांचा पाऊस पाडत आहेत.

पण तेवढ्यातचं एक मित्र नोटा नोटा उधळत-उधळत वधू-वराच्या अंगावर पडतो. यामुळे नवरदेवास राग येतो. आणि तो लगेच त्या मित्राला जोरदार कानाखाली लगावतो आणि तिथून जाण्यासाठी सांगतो. या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक मिळाले आहेत. लोक या व्हिडिओवर मजेदार कमेंट करत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button