हल्ली अनेकजण तणावग्रस्त दिसतात आणि त्यातील बरेच जण तणावमुक्तीचे मार्ग शोधण्यासाठी धडपडताना दिसतात. (Relaxation techniques) या पार्श्वभूमीवर, एक अगदी सोपा, कुणालाही मन लावून करता येईल असा विश्रांतीतून तणावमुक्तीचा मार्ग अवलंबून पाहता येईल.
आजच्या धावपळीच्या जगात तग धरून रहायचं असेल, तर शांतपणे ताणतणावाशी दोन हात करणं अपरिहार्य ठरतं. आपल्यातले काहीजण या मुकाबल्यात यशस्वी होतात. काही मंडळी मात्र ताणतणावाशी दोन हात करण्याचे कुठलेच मार्ग न मिळाल्याने सचिंत, ताणग्रस्त असल्याचेच जाणवते. अशा व्यक्तींपुढे मग उच्च रक्तदाब, अस्वस्थता, चिडचिडेपणा, उतावळेपणा अशा त्रासांना, तक्रारींना भिडायची वेळ येते. ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ताणतणावांना चार हात दूरच ठेवण्यासाठी एक साधासोपा उपाय खरं तर ही मंडळी अमलात आणून पाहू शकतात.
आपल्या शरीराचे स्नायू शिथिल सोडून विश्रांती घेण्याची ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. ज्यांनी अजूनपर्यंत ताण कमी करण्याच्या द़ृष्टीने काही प्रयत्न केलेले नाहीत, त्यांनी या पद्धतीपासून सुरुवात करायला हरकत नाही. याला कुठलीही साधनसामग्री लागत नाही आणि तणावमुक्तीची, शरीर-मनाला विश्रांती मिळवण्याची ही पद्धत कुठेही करण्याजोगी आणि सोपी आहे. त्यामुळे ती करून पाहायला कुणाची काय हरकत असावी? ही पद्धत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया!
डॉ. संतोष काळे
हेही वाचा :