Latest

Redmi 12 च्या 5G मोबाईलची जोरदार चर्चा; या दिवशी भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमतीबाबत माहिती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Xiaomi Redmi च्या भारतीय चाहत्यांसाठी १ ऑगस्ट हा दिवस खूप खास असणार आहे. याचे कारण म्हणजे कंपनी या दिवशी भारतात Redmi 12 चा 5G फोन, Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची नवीन सीरीज लॉन्च करणार आहे. हे सर्व मॉडेल्स आपापल्या सेगमेंटमध्ये प्रसिद्ध उपकरणे म्हणून ओळखले जातात. परंतु या सर्वांमध्ये, Redmi 12 5G ची प्रतीक्षा चाहत्यांना सर्वात जास्त आहे. अनेकजण हा नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घेऊया या नवीन Redmi 12 5G मधील फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमती अधिक माहिती. (Redmi 12 5G Mobile)

Redmi 12 5G Mobile भारतात लॉन्च

Redmi 12 5G हा फोन भारतात १ ऑगस्ट २०२३ रोजी लॉन्च होईल. हा मोबाईल फोन अद्याप जगातील कोणत्याही देशात सादर करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा फोन जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल. तसेच Redmi 12 5G भारतीय बाजारपेठेतही प्रथम उपलब्ध करून दिला जाईल. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता या फोनचा लॉन्चिंग इव्हेंट सुरू होईल, जो कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि YouTube चॅनेलवर थेट पाहता येईल.

Redmi 12 5G Price : किंमत

6GB RAM + 128GB स्टोरेज = ₹9,999
8GB RAM + 256GB स्टोरेज = ₹13,999
Redmi 12 5G या मॉडेलबद्दल सांगितले जात आहे की हा मोबाईल फोन दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये एक 6GB रॅम आणि दुसरा 8GB रॅम व्हेरिएंट असणार आहे. 6GB रॅम वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आणि 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये असेल. तसेच हा मोबाइल ऑफर किंमतीत देखील उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.

Redmi 12 5G च्या Specifications

  • 6.79" FHD+ 90Hz Display
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 2
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

स्क्रीन (Screen) : Redmi 12 5G फोनबद्दल असे सांगितले जात आहे की यामध्ये 6.79-इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले (Full HD+ Punch-Hole Display) दिला जाऊ शकतो. तसेच IPS LCD पॅनेलवर आधारित ही स्क्रीन असेल अशी माहिती कंपनीमार्फत दिली जात आहे.

प्रोसेसर (Processor) : Redmi 12 5G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी, 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 ऑक्टाकोअर प्रोसेसर असेल अशी प्राथमिक माहिती आहे. हा प्रोसेसर 2.2GHz क्लॉक स्पीडवर काम करेल. तसेच, ग्राफिक्ससाठी Adreno 613 GPU हे स्पेसिफिकेशन यामध्ये असेल असा अंदाज आहे.

मेमरी (memory) : Redmi 12 5G हा भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध केला जाईल. यामध्ये 6 GB RAM आणि 8 GB RAM असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करेल.

कॅमेरा (Camera) : फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सल (50 Mega Pixle) व सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा (2 Mega Pixle) मॅक्रो लेन्स असतील अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच, Redmi 12 5G फोन 5-मेगापिक्सेल (Front Camera : 5-Mega Pixle) सेल्फी कॅमेरा असे फिचर्स यामध्ये असतील.

बॅटरी (Battery) : पॉवर बॅकअपसाठी, या Redmi स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी असेल. यामध्ये जलद चार्जिंग तंत्रज्ञान देखील दिले जाईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT