Latest

सर्व बँकांच्या ATM मधून आता कार्डशिवाय पैसे काढता येणार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डविना पैसे काढता यावी अशा नव्या सुविधेची  घोषणा केली. RBI ने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे नवे पाऊल उचललेले आहे. या नवीन प्रणालीमध्ये क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर करण्यात येणार नाही. या नव्या सुविधेद्वारे कार्ड स्किमिंगची शक्यता कमी होईल.

RBI चे डेप्युटी गव्हर्नर रवी शंकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये या सुविधेची माहिती दिली. ते म्हणाले की, " आम्ही कार्डलेस रोख रक्कम काढण्यासाठीची नवी सुविधा सुरू करत आहोत. याबाबत UPI द्वारे प्रमाणिकरण प्रस्तावित आहे. ही सुविधा कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये वापरली जाऊ शकते तसेच थर्ड पार्टी एटीएम किंवा व्हाइट लेबल एटीएममधून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. आम्ही या प्रणालीतील बदलांवर आणि सुचनांवर काम करत आहोत."

कार्ड शिवाय पैसे काढण्याच्या सुविधेमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापरात फारसा बदल होणार नाही. वापरकर्ते अजूनही त्यांचे कार्ड वापरून पैसे काढू शकतील. तुम्ही कुठेही खरेदीसाठी किंवा हॅाटेलमध्ये जाल, त्यावेळेस तुम्ही कार्डद्वारे पैसे देऊ शकता. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "आम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड देणे थांबवणार नाही, कारण ते इतर अनेक सुविधांसह येतात. ते केवळ रोख पैसे काढण्यासाठीच नव्हे तर कोणत्याही रेस्टॉरंट, दुकान किंवा इतर कोणत्याही देशासाठी देखील वापरले जाते." क्रेडिट आणि डेबिट मध्ये पेमेंट करण्यासाठी कार्ड बनवणे सुरूच राहील.

ही नवीन प्रणाली काम कशी करेल ?

  • कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी, तुमच्याकडे UPI आयडी असणे बंधनकारक आहे. यामध्ये UPI द्वारे सर्व व्यवहार प्रमाणित केले जातील.
  • ATM वर गेल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर "कॅशलेस विथड्रॉ" पर्याय निवडावा लागेल.यानंतर, एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल, जो यूपीआय अॅपमध्ये स्कॅन करावा लागेल.
  • त्यानंतर वापरकर्त्यास UPI पिन टाकावा त्यानंतर एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील.

नवीन कार्डलेस कॅश विथड्रॉलचे फायदे

कार्डलेस कॅश विथड्रॉल प्रणालीमुळे नेहमी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बाळगण्यावर अवलंबून राहणे कमी होईल. यासाठी वापरकर्त्याजवळ नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि UPI आयडी असलेला स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.

आरबीआयने सांगिल्याप्रमाणे, ही नवीन सेवा सुरू केल्याने कार्ड स्किमिंगचा धोका कमी होईल. तसेच वापरकर्त्यांस त्यांचे एटीएम कार्ड स्किम आणि क्लोन झाल्याबद्दलची काळजी करण्याची गरज नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT