Latest

जमशेदजी टाटा यांच्या जयंतीनिमित्ताने रतन टाटा झाले भावूक!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची जयंती आहे. या निमित्ताने रतन टाटा यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जमशेदजी टाटा यांच्या पुतळ्यासमोर स्वतः उभे राहिलेला फोटो रतन टाटांनी शेअर केला आहे. तसेच जयंतीनिमित्ताने टाटा समुहाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत.

रतन टाटा यांनी इन्स्टाग्राम फोटो शेअर करत लिहिले आहे की, "श्री जमशेदजी नुसरवानजी टाटा यांनी आपली प्रेरणा, आपली नैतिकता आणि मूल्य, आपली दूरदृष्टी आणि निस्वार्थता प्रदान केलेली आहे. त्यातून हजारो नागरिकांना प्रतिष्ठा आणि उपजीविका बहाल केलेली आहे. टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांना, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या जयंतीच्या शुभेच्छा."

जमशेदजी नुरसवानजी टाटा हे भारतातील आघाडीचे उद्योगपती होता. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ साली झाला होता. त्यांनी भारतीतील सर्वात मोठ्या टाटा समुहाची स्थापन केली. टाटा समुहाला जे मोठं यश मिळालेलं आहे, त्यामागे फक्त जमशेदजी टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना 'भारतीय उद्योगाचे जनक', असंही म्हटलं जातं. त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि एक मिशन होते.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT