किरीट सोमय्यांचे मुंबईच्या महापौरांवर आरोप | पुढारी

किरीट सोमय्यांचे मुंबईच्या महापौरांवर आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) सदनिका हडप केल्याचा आरोप गुरूवारी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सोमय्या यांच्याकडून हे आरोप करण्यात आले आहेत.

या प्रतिज्ञापत्रात पेडणेकर यांनी गोमाता नगर, बिल्डिंग नंबर २, ६०१, जे.के. मार्ग, लोअर परळ असा निवासी पत्ता सादर केला आहे. पंरतु, चौकशीअंती गोमात नगर येथील झोपडपट्टीत किशोरी पेडणेकर अथवा त्यांचे पती किंवा मुलगा वास्तव्याला नव्हते, अशी माहिती समोर आली असल्याचा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आला.

गोमाता नगरातील अर्धा डझनमधील एसआरएचे गाळे महापौरांच्या ताब्यात कसे ? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. ही बेनामी मालमत्ता आहेत का? याचा तपास करावा, अशी विनंती आयकर विभागाकडे केल्याचे सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या, मुंबईच्या महापौर किती खोटे बोलतता?, कसे घोटाळे करतात? आणि गरीबांचे गाळे हडपतात याचा हा पुरावा आहे. हीच शिवसेना ‘माफिया सेने’ ची संस्कृती आहे.

याच दरम्यान मंत्री अनिल परब आणि किशोरी पेडणेकर यांच्या घोटाळ्यासंबंधी पाठपुरावा करण्यासाठी अनेक विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी दिल्लीत असल्याचे सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले. ( मुंबईच्या महापौरांवर गंभीर आरोप )

हेही वाचलंत का? 

Back to top button