Latest

रश्मिका ठरली Deep Fakeची बळी; मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; Big Bनी केली कारवाईची मागणी | Rashmika Deep Fake Video

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा कशा प्रकारे गैरवापर होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे Deep Fake टेक्नॉलॉजी. एखाद्या व्हिडिओत दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि आवाज हुबेहुबरीत्या बदलण्याचा चमत्कार हे तंत्रज्ञान करू शकते. हा बदल इतका अचूक असतो की सर्वसामान्यांना खरा व्हिडिओ आणि खोटा व्हिडिओ यातील फरक ओळखणेही कठीण जाते. या तंत्रज्ञानचा आत रश्मिका मंधना बळी ठरली आहे. रश्मिकाचा चेहरा वापरून एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ खरा की खोटा हे ओळखता न आल्याने रश्मिकाचाच व्हिडिओ असे समजून हा व्हिडिओ एक्सवर लाखो लोकांनी पाहिला आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या महिलेचा आहे. झारा पटेल लिफ्टमधून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला Deep Fake तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करण्यात आले असून झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. पत्रकार अभिषेक कुमार यांनी हा प्रकार उघकीस आणला आहे. हा व्हिडिओ अनेकांना अक्षेपार्ह वाटला आहे.

Deep Fake म्हणजे काय?

हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT