Latest

Badshah Dating to Actress : रॅपर बादशहा पंजाबी अभिनेत्रीच्या प्रेमात

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाइन डेस्क : प्रसिद्ध रॅपर-गायक बादशहा नुकताच 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या वेब सीरिजमध्ये झळकला होता. दरम्यान, बादशहा याने करण जोहर यांच्या एका कार्यक्रमात आपण सिंगल असल्याचे सांगितले होते . मात्र, बादशहा चंदीगडची पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीला डेट (Badshah Dating to Actress) करत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी बादशहा आपल्या पत्नीपासून विभक्त झाला आहे. त्याच्यामध्ये आणि पत्नी जस्मिनमध्ये लॉकडाऊनच्या काळात बिनसले. तेव्हापासून ती पंजाबमध्ये वेगळी राहत आहे.

दरम्यान, आता बादशहा आणि अभिनेत्री ईशा रिखीमध्ये (Badshah Dating to Actress) प्रेम फुलू लागले आहे. हे दोघेजण एक वर्षापासून एकमेकांना डेट करू लागले आहेत. परंतु, ते आपल्या नात्याला सामान्य ठेवू इच्छितात. ते आपले नाते हळूहळू पुढे नेत आहेत. बादशहाच्या निकटवर्तीयांकडून असे समजते की, ते एका पार्टीमध्ये भेटले. आणि त्यापासून त्यांच्यामध्ये प्रेमाचे रंग भरू लागले. ते एकमेकांना डेट करू लागले आहे. बादशहा आणि ईशा यांनी आपल्या नात्याबद्दल आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. त्यांचे घरचेही त्यांच्या नात्यावर खूश आहेत.

Badshah Dating to Actress : बादशहाने घेतला पत्नीपासून घटस्फोट

बादशहाचे त्याची पत्नी जस्मिनसोबत २०१९ च्या मध्यात मतभेद होऊ लागले. कोरोनानंतर लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्याची दरी आणखी रुंदावली. बादशहा आणि जस्मिन यांना २०१७ मध्ये जेसी ग्रेस मसिह नावाची मुलगी झाली. मुलगीच्या जन्माचे त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. परंतु, घटस्फोटानंतर जस्मिन मुलगीला घेऊन लंडनला गेली. तर कामानिमित्त बादशहा चंदीगड, दिल्ली आणि मुंबईमध्ये राहू लागला.

दरम्यान, बादशहा वर्षभर तीन संगीत व्हिडिओच्या कामात व्यस्त आहे. विनाश, वूडू आणि ट्रॅप मुंडे असे तीन म्युझिक व्हिडिओ आहेत. तर एका व्हिलन रिटर्न्समध्ये छोटी भूमिकाही साकारली आहे. तर धाकडसाठी त्यांनी संगीत दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT