पुढारी ऑनलाईन डेस्क : रॅपर आणि गायक हनी सिंगने (Yo Yo Honey Singh ) 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आइज' यासारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांनी एक काळ गाजविला होता. पंरतु, मध्यंतरी हनी सिंगला बायपोलर डिसऑर्डर आजारांचे निदान झाले आणि तो नैराश्यात गेला. या आजारांमुळे हनी सिंग केवळ संगीत जगतापासून दूर गेला नाही तर त्याचे औषधांमुळे वजनही खूपच वाढले. मात्र, त्याने हार मानली नाही. या आजारांवर मात करत तो पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात पदार्पणास सज्ज झाला आहे.
हनी सिंगने नुकतेच पुन्हा गाण्याच्या दुनियेत सज्ज होत त्याच्या आगामी गाण्याच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. याच दरम्यान हनीने (Yo Yo Honey Singh ) नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला झालेल्या बायपोलर डिसऑर्डर आजाराची आणि त्यातून कशी मात केली? याची माहिती दिली आहे. यात हनीने '२०१४ मध्ये बायपोलर डिसऑर्डरचे निदान झाले आणि त्यानंतर हळूहळू मी चाहत्यांच्या नजरेतून दूर गेलो. माझी गाणी येण्याचे बंद झाले. मी हळूहळू नैराश्यात जावून मद्यपान सुरू केलं. यानंतर माझी तब्येत खूपच खालावत गेली. या आजारातून बाहेर पडण्यास मला पाच वर्ष लागली. यावेळी आईने मला पुन्हा उभारी देण्यास मदत केली. ती नेहमी म्हणायची की, तू संगीत निर्माता म्हणून सुरुवात केलीस. त्यामुळे बीट्स लिहायला सुरुवात कर. हे मी केले आणि हळूहळू माझी गाणी पुन्हा हिट होत गेली.'
जेव्हा 'बायपोलर डिसऑर्डर या आजाराने ग्रस्त होतो तेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये खूप काही घडत होते. आजारी पडण्याच्या आधी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत टूर केली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील एका प्रोजेक्टवरही वर्षभर काम केले होते. हा शो सुरू झाला आणि माझे काम वाढले. तर एका पंजाबी चित्रपटातही काम करत होतो. याच दरम्यान 'रॉ स्टार' च्या सेटवर गाणे गात असताना बेशुद्ध पडलो आणि बायपोलर डिसऑर्डर आजाराची माहिती मिळाली. यानंतर माझ्या मेंदूत काही तरी प्रॉब्लेम असल्यासारखे वाटत होते.' असे त्याने सांगितले आहे.
हनी सिंगने नुकतेच 'रंगीला' चित्रपटातील 'यायी रे' हे गाणे रिमिक्स केले आहे. जे चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे. हनी सिंगने २००३ मध्ये सेशन आणि रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो स्वत:ची गाणी तयार करून संगीतकार बनला.
हेही वाचलंत का?