Latest

Boycott Brahmastra : बॉलिवूडला धक्का! लाल सिंह चड्ढा, रक्षाबंधन नंतर ‘बायकॉट ब्रह्मास्त्र’चा ट्रेंड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानचा लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' चित्रपटानंतर आता रणबीर कपूर निशाण्यावर आला आहे. त्याचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी बॉलिवूडमध्ये जे जे चित्रपट येत आहेत. जवळजवळ सर्व बायकॉट करण्याची मागणी होत आहे. तसा ट्रेंडही ट्विटरवर सुरू आहे. आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ला काही नेटकऱ्यांनी खूप विरोध केला. अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'चीदेखील तिचं स्थिती आहे. हृतिक रोशनच्या 'विक्रम वेधा'वरही बहिष्काराची मागणी केली जात आहे. हृतिक रोशनने आमिर आणि त्यांच्या चित्रपटाचे कौतुक केले होते. आता रणबीर कपूर निशाण्यावर आहे. त्याचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र'ला बायकॉट करण्याबाबत नेटकरी म्हणत आहेत. ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड होत आहे. (Boycott Brahmastra)

'ब्रह्मास्त्र' चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. हा करण जोहरचा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि साऊथ स्टार नागार्जुनही आहेत. दरम्यान रणबीर कपूर आणि त्याचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' निशाण्यावर आला आहे.

रणबीरवर टीका

जेव्हा 'ब्रह्मास्त्र' का ट्रेलर आला होता, तेव्हा लोकांनी नोटिस केलं की तो चप्पल घालून मंदिरात जात असतो. आता लोक म्हणतात की या चित्रपटात हिंदू धर्माचा अपमान झाला आहे.

'पीके' फोटोज व्हायरल

आता ट्विटवर आमिर खानच्या 'पीके' चित्रपटाचे फोटोज व्हायरल होत आहेत.

करण जोहरवर राग

एका युजरने करणवर खूप टीका केली आहे. त्याने म्हटलंय-आमच्याकडूनचं कमावतोस आणि आम्हालाच कमी लेखतोस. वाह रे करण जोहर.'

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT