Latest

Ranbir Kapoor-Alia Bhatt : नवविवाहीत रणबीर-आलियाचा पहिला रोमँटिक फोटो आला समोर!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट ( Ranbir Kapoor-Alia Bhatt) हे तब्बल पाच वर्षांच्‍या रिलेशनशीपनंतर अखेर लग्‍न बेडीत अडकले. नववधू आलियानं नुकताच इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर केलाय. यात दोघे किस करताना दिसत आहेत. फोटोसाठी पोज देताना हे जोडपे पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये आकर्षक दिसत होते.

"आमचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत घरी … आमच्या आवडत्या ठिकाणी – बाल्कनीत, जिथे आम्ही आमच्या नात्याची ५ वर्षे घालवली तिथे आम्ही लग्न केले." अशी कॅप्शन देत अलियानं हा रोमँटिक फोटो शेअर केलाय. हा फोटोला ८८ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर दोघांनाही सुखी संसारासाठी चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या क्षणात प्रेम दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. Love, रणबीर आणि आलिया, असेही अलियाने पुढे म्हटले आहे.

रणबीर-अलियाच्या ( Ranbir Kapoor-Alia Bhatt) लग्नसोहळ्याला अंबानी कुटुंबीय, सचिन तेंडुलकर, करीना कपूर खान, सैफ अली खान, चित्रपट निर्माते अयान मुखर्जी, लव रंजन आणि करण जोहर यांसारखे बी-टाउन सेलेब्स उपस्थित होते. वास्तू बंगल्यावर या जोडप्याने सात फेरे घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली. दरम्यान, हा लग्नसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडला. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होती. असे असले तरीही बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी होती.

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधींची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. अखेर गुरुवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रणबीर आणि आलिया विवाह बंधनात अडकले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT