Latest

Ranbir-Alia Wed pics : कपूर फॅमिलीने सुनेचं केलं असं स्वागत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir-Alia Wed) दीर्घ रिलेशनशिपनंतर विवाहबंधनात अडकले. अद्यापही सोशल मीडियावर फॅन्स या कपलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. भट्ट आणि कपूर फॅमिलीसोबत (Ranbir-Alia Wed) खास पाहुणे आणि मित्रमंडळी लग्नात उपस्थित होते. लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम करणार नसल्याचे या कपलने आधीच घोषित केले होते. आता लग्नात आलेल्या पाहुण्यांनी फोटो शेअर करणं सुरू केलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर कपूर फॅमिली फोटो व्हायरल होत आहे.

कपूर फॅमिलीने केलं सुनेचं स्वागत

छायाचित्रात नवविवाहित जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये करीना आणि करिश्मा कपूर हे रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर, अनिशा मल्होत्रा, रणबीरच्या काकूचा मुलगा निखिल नंदा, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा, रीमा जैन आणि त्यांची मुले आधार जैन आणि अरमान जैन दिसत आहेत. या छायाचित्रासोबत दुसऱ्या छायाचित्रात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहताही दिसत आहेत.

आलिया भट्टने शेअर केले फोटो

लग्नानंतर लगेचच, आलियाने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिलंय- 'आज, माझ्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये, घरी… आमच्या आवडत्या ठिकाणी, ५ वर्षे घालवली आणि आता आम्ही लग्न केले आहे. आमच्याकडे आधीच खूप आठवणी आहेत. ज्यात हास्य, प्रेम, राग, मारामारी, रात्री, चित्रपट आहे. आमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या काळात आमच्यासोबत असण्याबद्दल आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद. या क्षणांनी खूप खास बनवले आहे.

(insta photo – stylebyanissa साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT