Latest

Ramya Krishnan Birthday : श्रीदेवीच्या एका नकारावर ‘शिवगामी’चं बदललं आयुष्य

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री राम्या कृष्णन हिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे. राम्या म्हटलं तर तिचा चेहरा फारसा प्रेक्षकांना आठवणार नाही परंतु, प्रसिद्ध आणि गाजलेल्या 'बाहुबली' चित्रपटातील 'राजमाता शिवगामी' कोणीही विसरू शकणार नाही. या भूमिकेने तिने वाहवा मिळवून दिली. तिच्या भारदस्त भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले. आज राम्या कृष्णनचा ५३ वा वाढदिवस ( Ramya Krishnan Birthday ) आहे. यामुळे जाणून घेवूया तिच्याविषयी…

राम्याचा जन्म ५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नईमध्ये झाला. राम्याने वयाच्या १४ व्या वर्षी 'वेल्लई मनसु' या तमिळ चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केले. तिचा हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला होता. साऊथसोबत राम्याने बॉलिवूडमध्येही अभिनयाची मोहर उमठविली. राम्याने १९९३ मध्ये यश चोप्रा यांचा 'परंपरा' आणि डेविड धवनचा 'बनारसी बाबू', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'लायगर' आणि रजनीकांत स्टार 'जेलर' यासारख्या २०० हून अधिक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या.

दरम्यान, ४५ वर्षाची असताना राम्याच्या करिअरमध्ये एक मोठा बदल झाला. २०१५ मध्ये राम्याला 'बाहुबली' चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिचे नशीब बदललं, या चित्रपटात राम्याला रागीट 'राजमाता शिवगामी' च्या भूमिकेत पाहायला मिळाले. ही भूमिकेने तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. परंतु, या भूमिकासाठी याआधी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला कास्ट केलं होते. परंतु, श्रीदेवीने जास्त पैसाचा मागणी करत चित्रपटासाठी नकार दिला आणि ही ऑफर राम्याच्या पदरात पडली. या भूमिकेनंतर राम्याला जगभरात खास ओळख मिळाली.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, राम्याने १२ जून २००३ रोजी दिग्दर्शक कृष्णा वामसीसोबत लग्न केले. राम्याला ऋत्विक नावाचा मुलगा आहे. चित्रपटांमध्ये एकत्रित काम करताना रम्या आणि कृष्णा वामसीची ओळख झाली आणि एकमेंकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर राम्या आणि कृष्णा यांनी लग्न केले. राम्या आणि कृष्णा खूप आनंदी जीवन जगत आहेत. ( Ramya Krishnan Birthday )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT