Latest

Ramlalla New Photo: ‘रामलल्ला’ची मूर्ती साकारतानाचा फाेटाे अरुण योगीराज यांनी केला शेअर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत २२ जानेवारी, २०२३ रोजी मोठ्या उत्साहात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्तीची राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या याच रामलल्लाची मूर्ती साकारतानाचा फोटो स्वत: शिल्पकार अरुण यांनी त्यांच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Ramlalla New Photo)

रामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू रामाचे न पाहिलेले छायाचित्र शेअर केले आहे. हे चित्र त्यावेळचे आहे जेव्हा ते रामलल्लाची मूर्ती साकारत होते. फोटोसोबतच्या संदेशात अरुण योगीराजने म्हटले आहे की, "कामाच्या प्रगतीवेळी… आपल्या संवेदनशील स्पर्शातून रामलल्ला अनुभवल्याने अंतिम क्षणी मोठा बदल होईल, असा विश्वास वाटत होता". शिल्पकार योगीराज यांनी शेअर केलेल्या फोटोत ते स्वत:ही एका हातात उपकरण आणि दुसऱ्या हाताने मूर्तीची हनुवटी पकडलेली दिसत आहे. (Ramlalla New Photo)

फोटो शेअर करताच २५ हजार कमेंट

रामलल्लाची मूर्ती साकरणाऱ्या शिल्पकार अरुण योगीराज आणि त्यांच्या कलेचे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे. योगीराज यांनी रामलल्ला मूर्ती साकारतानाचा फोटो शेअर करताच तासाभरात २५ हजार लोकांनी फोटोला लाईक केले. हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर देखील करण्यात आला आहे. फोटोवर लोकांनीही भरपूर कमेंट केल्या आहेत. दरम्यान, एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, "हे खूप छान काम आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो" असेही म्हटले आहे. (Ramlalla New Photo)

'डोळ्याचे दुखणे'… तरीही तितक्याच तन्मयते मूर्ती साकारली

त्यामध्ये चैतन्य जाणवू लागते! सात महिन्यांपूर्वी त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे काम सुरू केले होते. काळ्या पाषाणातील ही मूर्ती घडवण्यापूर्वी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. पाच वर्षांच्या कोमल बालकाच्या रूपातील ही मूर्ती घडवत असताना त्यामधील सूक्ष्म तपशील, चेहर्‍यावरील भाव, शरीराची ठेवण लक्षात घेऊन त्यांनी हे काम सुरू केले. या कामाचा ध्यास घेतल्याने त्यांनी अनेक रात्री जागून काढल्या आहेत. मूर्ती घडवत असताना एकदा दगडाचा एक छोटासा, अणुकूचीदार तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला होता व ऑपरेशन करून तो काढावा लागला होता. डोळ्याचे हे दुखणे असतानाही त्यांनी तितक्याच तन्मयतेने  रामलल्‍लांची मूर्ती साकारली.

मूर्तिकार, शिल्पकार अरुण योगीराज यांच्याविषयी…

अरुण योगीराज हे चाळीस वर्षांचे आहेत. गेल्‍या पाच पिढ्या त्‍याचे कुटुंब मूर्ती घडवण्याचे काम करते.  कर्नाटकातील म्हैसूर येथील हे कुटुंब वडियार राजघराण्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. स्वतः अरुण योगीराज यांनी देशातील अनेक प्रसिद्ध मूर्ती, पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये राजधानी दिल्लीतील इंडिया गेटजवळील अमर जवान ज्योतीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचा तसेच केदारनाथ येथील आद्य शंकराचार्यांच्या भव्य मूर्तीचाही समावेश आहे. या शिल्पकाराच्या हस्तस्पर्शाने निर्जीव पाषाणही जणू काही जिवंत होतो.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT