पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचा डायट प्लॅन (आहार नियाेजन) अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी तयार आहे, असा अचाट दावा पाकिस्तान माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी केला आहे. त्यांची ही टिप्पणी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यांची जाेरदार खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तानमधील 'सुनो न्यूज'शी बोलताना रमीझ राजा यांनी सांगितले की, 'फुटबाॅलपटू रोनाल्डोचा डायट प्लॅन 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी ठरवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जगभरात त्यांची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानमधील अनेक माजी क्रिकेटपटूअ आपल्या विचित्र टिप्पण्यांमुळे चर्चेत राहिले आहेत.
रोनाल्डोने या वर्षात आतापर्यंत 46 गोल केले आहेत आणि या काळात त्याने 12 असिस्ट केले आहेत म्हणजेच गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या आहेत. या कॅलेंडर वर्षात तो मँचेस्टर सिटीचा एर्लिंग हॅलँड (48) आणि बायर्न म्युनिकचा हॅरी केन (47) यांच्यानंतर तिसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. (Ramiz Raja on Ronaldo)
रोनाल्डोचे नाव युरो कप 2024 च्या पात्रता फेरीत सुरुवातीच्या क्रमवारीत होते. पोर्तुगालने गेल्या आठवड्यात युरो 2024 पात्रता फेरीत लिक्टेनस्टाईन आणि आइसलँडचा पराभव केला. लिचटेनस्टाईनविरुद्धच्या सामन्यातही त्याने गोल केला होता. पोर्तुगालने दोन्ही सामने 2-0 ने जिंकले. पोर्तुगाल आधीच जर्मनीत पुढील वर्षी होणाऱ्या युरो कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही रोनाल्डोच्या खेळाचे आणि फिटनेसचे कौतुक केले आहे. विराट हा रोनाल्डोला आपला आदर्श मानतो. फिटनेसच्या बाबतीत तो त्याच्यापासून प्रेरित आहे. 38 व्या वर्षी रोनाल्डो सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे . (Ramiz Raja on Ronaldo)
हेही वाचा :