Latest

Ram Mandir Warning: सावधान..! QR कोडने रामभक्‍तांची लूट : VSP कडून सावधानतेचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनासोहळ्याची धामधूम सुरू आहे. सोमवार २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, क्यूआर कोड दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे. तसेच त्यांनी अशा घटनांपासून रामभक्तांनी सावध राहावे, असा इशाराही दिला आहे. (Ram Mandir Warning)

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी म्हटले आहे की, "काही लोक श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या नावाने बनावट आयडी बनवून पैशांची मागणी करत आहेत. रामभक्तांची फसवणूक केली जात आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना साेहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा करण्यास सांगितले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला फटका बसण्यापूर्वी सावध रहा , असे आवाहन बन्सल यांनी केले आहे. (Ram Mandir Warning)

अयोध्या मंदिरासाठी देणग्या मागणाऱ्या बनावट सोशल मीडिया संदेश पसरवत भक्‍तांची लूट करणार्‍या लोकांवर कारवाई करण्याची मागणी देखील विनोद बन्सल यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री कार्यालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस प्रमुखांकडे केली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही अशा फसवणूक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची विनंतीही यांनी केली आहे. (Ram Mandir Warning)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT