Latest

Ram Mandir Inauguration : 18 दरवाजांवर 100 किलो सोन्याचा मुलामा

Shambhuraj Pachindre

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेले 18 दरवाजे बसविण्यात येणार आहेत. यातील 18 दरवाजांना दिल्लीतील कारागिरांनी 100 किलो सोन्याचा मुलामा दिला आहे. सोन्याचा दरवाजा 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद असणार आहे. (Ram Mandir Inauguration)

विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नेण्यात आलेल्या सागवानी लाकडांचा राम मंदिरातील दरवाजांसाठी वापर करण्यात आला आहे. राम मंदिरात एकूण 46 दरवाजे असणार आहेत. सागवानासाठी बनविण्यात आलेले दरवाजे 1000 वर्ष टिकणार आहेत. दरवाजांवर नक्षीकाम करण्यात आले असून; यावर विष्णू कमल, वैभवाचे प्रतीक गज, देवी आदींची चित्रे पाहावयास मिळणार आहेत. (Ram Mandir Inauguration)

अयोध्यानगरीचा थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे नकाशा

नवी दिल्ली : जेनेसिस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या वतीने अयोध्यानगरीचा थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे नकाशा तयार करण्यासाठी निवड करण्यात आली. अयोध्या विकास प्राधिकरणाच्यावतीने या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

सोन्याच्या पादुका

हैदराबादस्थित छल्ला श्रीनिवास शास्त्री (वय 64) यांनी हैदराबाद येथून पायी चालत जाऊन प्रभू श्रीरामासाठी अनोखी देणगी दिली आहे. त्यांनी सोन्याच्या मुलाम्यातील पादुका राम मंदिर ट्रस्टला दान केल्या आहेत. मथुरेतील यज्ञांसाठी 200 किलो लाडू पाठविण्यात येणार आहेत. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेच्यावतीने हे लाडू पाठविण्यात येणार आहेत. तिरूपती देवस्थानच्या वतीने 1 लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत.  सीता मातेसाठी सुरतहून खास साड्या पाठविण्यात येणार आहेत. या साडीवर प्रभू श्रीराम आणि अयोध्येची छबी असणार आहे. मध्य प्रदेशातूनही 5 लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT