नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
देशातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा, रॅली, मिरवणुकांवरील बंदी ३१ जानेवारी पर्यंत कायम ठेवली आहे.
अशात सर्वच राजकीय पक्षांना समाज माध्यमांसह घरोघरी जावून प्रचार करावा लागणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशात घरोघरी जावून पक्षाची पत्रक वाटतांना दिसून येत आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा करतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रॅली ,सभा, सायकल रॅल, बाईक रॅलीवर बंदी घातली होती. काही पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्त आणि संबंधित अधिकार्यांची शनिवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान रॅली आणि सभांवरील बंदी मागे घेण्याची शक्यता होती.पंरतु, बैठकीत ही बंदी आणखी आठवड्याभरासाठी वाढवण्यात आल्याने जय्यत प्रचाराच्या तयारीत असलेल्या पक्षांचा हिरमोड झाला आहे.
यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर सभा, रॅली, सायकल रॅली, दुचाकी व चारचाकी रॅली, शोभायात्रा यांच्यावर १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. ही बंदी आज २२ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. आता महिन्याअखेरपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
हे ही वाचलं का ?