Latest

Rakhi Sawant : राखी सावंत पाेलीस ठाण्‍यातच ओक्साबोक्सी रडली, माजी पतीवर केले गंभीर आराेप

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : 

ड्रामा क्वीन राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच साेशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती तिचा सध्याचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर असलेल्या नव्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. सध्या राखी ओक्साबोक्सी रडलेल्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याने तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत ओशिवरा पोलीस स्टेशन गाठले. येथे माजी पती राकेशविराेधात तिने तक्रार दिली आहे.

राखी सावंतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे. राखी सावंतचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याने ती प्रचंड दु:खी झाली आहे. ती बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत पोलिस ठाण्यात गेली. ही घटना सांगताच, ती पोलिसांसमोर ढसाढसा रडायला लागली. पोलिसांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने, तिझे माजी पती रितेशवर गंभीर आरोप करत तो आपला छळ करत असल्याचे सांगितले.

पोलिसांशी बोलताना राखी सावंत म्‍हणाली, "रितेशने माझे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केले आहे. तो मला महणतो की, मी तुला आणि आदिलला एकत्र राहू देणार नाही. मी तुम्हा दोघांना बर्बाद करेन, असे मेसेज पाठवून तो मला त्रास देत आहे. तो मला सोशल मीडिवर घाणेरड्या शब्दात मेसेज पाठवतो. नात्यामध्ये असताना माझ्या पूर्वीच्या नवऱ्याने म्हणजेच रितेशने मला खूप त्रास दिला आहे. तो मला शिवीगाळ,मारहाण करायचा आणि घराबाहेर काढायचा. आता तो मला सोशल मीडियावर त्रास देत असल्याचा आराेप राखीने केला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT