Latest

Rajinikanth : रजनीकांत यांचा ‘थलायवर १७०’ चा दमदार फर्स्ट लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रजनीकांत (Rajinikanth) चा चित्रपट 'थलायवर १७०' (Thalaivar 170) चा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. लायका प्रोडक्शन्सने एक पोस्टर जारी केला आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार रजनीकांत स्वत: दिसत आहेत. बुधवारी लायका प्रोडक्शन्सने चित्रपटातील रजनीकांत यांची पहिली झलक शेअर केली. फुल ब्लॅक लूकमध्ये हँडसम ते खूप हँडसम दिसंत आहेत. (Rajinikanth)

पोस्टर शेअर करताना लायका प्रोडक्शन्सने लिहिलं, "लाईट्स कॅमेरा क्लॅप आणि ॲक्शन. आमचे सुपरस्टार @rajinikanth आणि थलायवर 170 च्या दमदार कलाकारांसोबत टीम पूर्णपणे उत्सुक आहे आणि भूमिका करण्यासाठी तयार आहे! आशा आहे की आपण सर्वजण थलायवर आमंत्रणाचा आनंद घ्याल. आता वेळ आली आहे काही कारवाई! जसे-जसे शूटिंग पुढे जाईल, आम्ही अपडेट घेऊन येऊ".

पोस्टरमध्ये रजनीकांत ब्लॅक सूटसोबत ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक गॉगल हातात घेताना दिसले.

अमिताभ बच्चन करणार रजनीकांत यांच्यासोबत काम

थलायवर १७० हे तात्पुरते चित्रपटाला नाव दिल्याचे म्हटले जात आहे. टीजे ज्ञानवेल द्वारा हा चित्रपट दिग्दर्शित आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन ३२ वर्षानंतर काम रजनीकांत यांच्यासोबत काम करणार आहेत. रितिका सिंह, मंजू वारियर, तुषारा विजयन, राणा दग्गुबाती, फहद फासिल यांच्याही भूमिका असतील. यामध्ये रजनीकांत एका रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT