Latest

Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त आज (दि.८) काढलेल्या मिरवणुकीत १४ मुलांना विजेचा धक्का बसला. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ऊर्जामंत्री हिरालाल नागर आणि पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. Maha Shivratri 2024

राजस्थानच्या कोटामध्ये कुन्हडी थर्मल चौकाजवळून शिव मिरवणूक जात होती. यावेळी विजेचा धक्का लागल्याने १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नेण्यात आलेल्या अनेक मुलांचे हात-पाय भाजलेले आहेत. जखमी मुलांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. Maha Shivratri 2024

या घटनेबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, जखमी मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास मुलांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT