Latest

डीएसपीचा महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पुलमध्ये खुल्लम खुल्ला रंगेलपणा, video व्हायरल!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बेवार येथील डीएसपी हीरालाल सैनी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जलतरण तलावात महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी तेथे एक लहान मुलही होते. याबाबत महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. डीएसपी हीरीलील सैनी यांनी संपूर्ण प्रकरणाला त्यांच्या विरोधातील षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

डीएसपी हीरालाल सैनी यांना पोलिसांनी उदयपूरमधील एका रिसॉर्ट मधून अटक केली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने रिसॉर्टवरती छापा टाकून अटक केली. या रिसॉर्टमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत डीएसपी एकत्र राहिले होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही होता.

ठाणे अंमलदाराला अटक

या प्रकरणात, एक प्रभारी ठाणे अंमलदाराला अटक केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलचा पती नागौर चितवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पण एफआयआर नोंदवला गेला नाही, कारण हे प्रकरण डीएसपीशी संबंधित होते. यामुळे ठाणे अंमलदार प्रकाशचंद मीना यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, कॉन्स्टेबलच्या पतिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत अस म्हटलय की, ७ मे २००१ ला त्यांच लग्न नागौरी जिल्ह्यातील तरुणीशी झाले. यानंतर २००८ मध्ये त्यांच्या पत्नीला राजस्थान पोलिस मध्ये नोकरी मिळाली. त्यांना ६ वर्षाचा एक मुलगाही आहे.

मुलासमोर अश्लिलता

महिला कॉन्स्टेबलने १३ जुलै २०२१ रोजी जलतरण तलावातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवले होते. यात महिलेचे ६ वर्षाचा मुलगाही दिसत आहे. नंतर काही वेळात दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात लिहिल होत पार्ट टु. हा व्हिडिओ २ मीनिट ३८ सेकंदाचा आहे. यात डीएसपी हीरालाल सैनी आमि महिला कॉन्स्टेबल दिसत आहेत. यावेळी कॉन्स्टेबलचा ६ वर्षाचा मुलगाही आहे. राज्य बाल संरक्षण आयोगाने देखील अश्लील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाची दखल घेतली आहे. गंभीर बाब असल्याचे सांगून आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनीवाल यांनी नागौर पोलिस अधीक्षकांकडे तीन दिवसांत अहवाल मागितला आहे.

डीएसपीकडून हा कट असल्याचा दावा

२०१८ पासून, हिरालाल सैनी ब्यावर येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून तैनात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती, परंतु त्यांनी त्यांची बदली रद्द केली. आता ते या वादात अडकले आहेत. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा डीएसपी हिरालाल सैनी म्हणाले की, हा त्यांच्याविरुद्धचा कट आहे. व्हिडिओ एडिट केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीपी एमएल लाठर यांनी ८ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून हिरालाल सैनी यांना निलंबित केले. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. डीएसपीविरोधात विभागीय चौकशी आधीच सुरू आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप एडीजी अशोक राठोड यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास एसओजी मुख्यालयातून केला जात आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला, कोणी व्हायरल केला याचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

हेही वाचलत का :

अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असणारे कोल्हापूरचे ओबेरॉय म्युझियम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT