Latest

Raj Thackeray met CM Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मराठी सूचना फलकांची अंमलबजावणी आणि टोल बूथच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याचे वृत्त एएनआयने X  पोस्ट करत दिले आहे. ( Raj Thackeray met CM Eknath Shinde)

Raj Thackeray met CM Eknath Shinde: ट्विट करत दिली भेटीची माहिती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री शिदे यांनी ट्विटरवरून माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी  येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. (Raj Thackeray met CM Eknath Shinde)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT