Latest

Sanjay Raut : राज ठाकरेंचा पक्ष आता वयात आलाय : संजय राऊतांचा टोला

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : मी काल झालेल राज ठाकरेचं भाषण ऐकलेले नाही. आज ते वाचलं. त्यांच्या पक्षाला गेले सतरा ऐक वर्ष होवून गेले असतील. आता त्यांचा पक्ष आता वयात आला आहे; पण त्‍यांच्‍या पक्षात काय चाललय हे मला माहीत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. २३) माध्‍यमांशी बोलताना लगावला.
मनसेचा गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर बुधवारी (दि.२२) मेळावा पार पडला. या वेळी राज ठाकरेंनी  शिवसेनेसह आणि महाराष्ट्रात सुरु असेलेल्या राजकारणावर निशाणा साधला होता.   यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राऊत म्‍हणाले की,  "मी काल त्याचे काल भाषण ऐकलं नाही. आज सकाळी मला कोणीतरी पाठवलं होतं ते वाचलं. राज ठाकरे यांच्‍या पक्षाला गेले सतरा वर्ष होवून गेले आहेत. आता त्यांचा पक्ष वयात आला आहे; पण पक्षात काय चाललय हे मला माहीत नाही.  गेले १८ वर्ष ते फक्त उद्धव ठाकरे यांच्‍यावरच टीका करत आहेत." (Sanjay Raut)

Sanjay Raut : सर्वांना वाटते उद्धव ठाकरेंची भीती 

उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते आहेत की मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह नारायण राणे, भाजप नेते  उद्धव ठकारे यांच्‍यावरच बोलत असतात. तसेच स्वत: राज ठाकरेही केवळ उद्धव ठाकरेंवर बोलतात. याचा अर्थ सर्वांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते, असेही राऊत या वेळी म्‍हणाले.
राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षावर बोलावे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, कायदा, सुव्यवस्था सारख्या अनेक समस्या आहेत त्यावर बोलावे. खलिस्‍तान समर्थक अमृतपाल महाराष्ट्रात येवून लपला आहे. त्याचा धोका  राज्‍याला आहे, पण त्याच्यावर कोणीच बोलत नाही. तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच चालतात. याच्यावरुन स्‍पष्‍ट होते की, विरोधी पक्षांमध्‍ये उध्दव ठाकरेंबद्दल किती भीती आहे . तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल विचार करा, असे आवाहनही त्‍यांनी विरोधी पक्षांना केले.

आज पवारांबरोबर बैठक, ईव्‍हीएमवर चर्चा होणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांची बैठक होत आहे. यावेळी 'ईव्हीएम' संदर्भात चर्चा होणार आहे. युरोपसह मोदींच्या आवडत्याही देशातही बॅलेट पेपरने निवडणूका होतात. जगभरातील सर्वच देशांनी ईव्हीएमवर निवडणूका नाकारल्या आहेत. ईव्हीएम वापरावर आपल्‍या देशातही अनेकांच्या शंका आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT