Latest

Monsoon Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; 5 जुलैपर्यंत मुसळधारेचा इशारा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, 5 जुलैपर्यंत या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस सुरू असून, 24 तासांत ताम्हिणी घाटात 210 तर लोणावळ्यात 48 तासांत 248 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती, राजस्थान ते मणिपूर व गुजरात ते केरळ कमी दाबाचा पट्टा, अशी स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण देशात मुसळधार पाऊस सुरू आहे.

गुजरात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असून, गेल्या चोवीस तासांत तेथे सरासरी 150 ते 200 मिमी पाऊस झाला आहे. जुनागढ जिल्ह्यात तब्बल 400 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस सुरू असून, तेथे सरासरी 100 मिमीपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 24 तासांत ताम्हिणी घाटात 210 मिमी पावसाची नोंद झाली. मान्सून अरबी समुद्रात प्रगती करीत असला तरीही त्याने अजून संपूर्ण देश व्यापलेला नाही. राजस्थानसह, पंजाबचा छोटासा भाग अजून व्यापण्यास वेळ लागत आहे. केवळ दोन टक्के भूभाग राहिलेला असून, तेथे अद्याप मान्सून पोहोचण्यास उशीर होत आहे.

घाट माथ्यावर विक्रमी पाऊस…

घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, गेल्या चोवीस तासांत ताम्हीणी 210, लोणावळा (48 तासांत 248), शिरगाव 209, ठाकूरवाडी 106, वळवण 127, अंम्बोणे 115, भिवपुरी 129, दावडी 144, डुंगरवाडी 165, कोयना 81, भिरा 125 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

24 तासांत राज्यातला पाऊस…

कोकणः माथेरान 185, ठाणे 156, पेण 145, खालापूर 144, कर्जंत 131, माणगाव 124, शहापूर 123, मुरबाड 120, विक्रमगड 115, काणकोण 113, साांताक्रूझ 111, माणगाव 108, साांगे 97, आंबरनाथ 95, महाड 95, म्हसळा 95, रत्नागिरी 94, उल्हासनगर 93, दापोली 93, पालघर 89, मध्य महाराष्ट: ओझरखेडा 136, हर्सुल 111, पेण 97, महाबळेश्वर 94, गगनबावडा 92, इगतपुरी 73, त्र्यंबकेश्वर 65, पौड मुळशी 58, शाहूवाडी 44, नाशिक 21, पुुणे 20, खेड, राजगुरू नगर 20, मराठवाडा : पाटोदा 2, धाराशिव 2, भूम 2, अष्टी 1, विदर्भ ः चिखलदरा 1, काटोल 1, दर्यापूर 1.

राज्यात जोर वाढणार…

गुजरात ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरात राज्यात अतिवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत असून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पाऊस वाढत आहे. 5 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे. मात्र, 4 जुलैपासून त्या भागातही पाऊस वाढेल असा अंदाज आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT