पुणे शहरात 24 तासांत 20 मिमी बरसला | पुढारी

पुणे शहरात 24 तासांत 20 मिमी बरसला

पुणे : शहरात गेल्या पाच दिवसांपासून सलग पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत 20 मिमीची भर पडली आहे. दररोज धीम्या गतीने पाऊस सुरू असल्याने गल्लीबोळात चिखल अन् डबकी तयार झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे रेनकोट, छर्त्यांची विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील सर्वच भागांत

24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. मान्सूनचे आगमन 25 रोजी झाले, त्यानंतर दररोज धीम्या गतीने भिजपाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवार पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता जोरदार पावसाची सर आली. सात वाजता पाऊस थांबला, नंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दुपारी 3 नंतर पुन्हा पाऊस वाढला. मात्र, काही काळ विश्रांती घेत सायंकाळी पुन्हा संथगतीने पाऊस सुरू झाला.

24 तासांतील पाऊस
शिवाजीनगर : 20.4
पाषाण : 26.4
लोहगाव : 11.8
चिंचवड : 18.5
लवळे : 1.5
मगरपट्टा : 0.5

4 जुलैपर्यंत मध्यम पाऊस

घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असून, तेथे 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 2 जुलै रोजी घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात 4 जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Back to top button