Latest

राज्यात पावसाची उघडीप; कमाल तापमानात वाढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, पाऊस पडण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील आठवडाभर पाऊस पडणे अवघड आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात यंदा जुलै महिन्यातील 15 तारखेपासून पाऊस सुरू झाला. हा पाऊस 25 ते 27 जुलैपर्यंत सुरू होता. मात्र त्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली आहे. सब हिमालयीन भागापासून पश्चिम बंगाल ते सिक्कीम पार करून बंगालचा उपसागर, पुढे गॅगस्टिकपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागापासून ते आंध्र प्रदेशापर्यंत चक्रीय स्थिती आहे. याबरोबरच दक्षिण कर्नाटकपासून ते कॉमोरीन ते पुन्हा तामिळनाडूपर्यंत द्रोणीय स्थिती आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT