Latest

Rainfall forecast : देशात अवकाळीचा मुक्काम वाढणार!; हवामान विभागाची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने उत्तर भारतातील काही राज्यांसह महाराष्ट्राला देखील झोडपले आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह येथील अनेक राज्यात हिमवृष्टी सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील विदर्भ आणि मराठवाड्याला देखील गेल्या चार दिवसात गारपीटीचा (Rainfall forecast) फटका बसला आहे. तर देशात पुन्हा एकदा ४ मे संपूर्ण भारतात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज २८ एप्रिलपासून ४ मे पर्यंत जवळपास संपूर्ण भारतात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशाचा पूर्वोत्तर उत्तरेकडील बहुतांश भाग वगळता देशात इतरत्र पावसाची पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पुढेच चार आठवडे अशीच स्थिती राहणार असल्याचा विस्तारित अंदाज देखील IMD पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसालिकर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीत दिला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT