Latest

Rainfall Forecast: सप्टेंबरमध्ये राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्‍ये पुन्हा पावसाच्या सरी कोसळणार; IMD ची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिनाभरापासून राज्‍यात पावसाने उघडीप दिली आहे.  ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाने सुरूवात केली. सप्टेंबरमध्ये देशातील काही भागांमध्ये बऱ्यापैकी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील मराठवाड्यासह, कोकणात देखील सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा सरी बरसणार असल्याचे, IMD पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत सांगितले आहे.

डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सप्टेंबरमधील येत्या चार आठवड्यात भारतीय हवामान विभागाने राज्यात विसंगत स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मध्य भारतासह, दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात पावसाच्या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Rainfall Forecast: येत्या २, ३ सप्टेंबरला मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांमध्‍ये पाऊस

शनिवारी २ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमधील विजांसह हलका ते मध्यम पावासाची शक्यता आहे तर, रविवारी ३ सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटल्याचे डॉ. होसाळीकर यांनी 'X' वरून केल्याल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT