Latest

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस वाढणार ! ‘या’ भागात यलो अलर्ट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या 24 तासांत काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आगामी 48 ते 72 तासांत राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. राज्यात 24 तासांत लोणावळा येथे 105 मि.मी., तर चिंचवड येथे 83 मि.मी. पावसाची नोंद झाली.

राज्यात मान्सून अंशतः सक्रिय झाला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत शनिवारी मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद झाली. आगामी 48 ते 72 तासांत राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात 3 व 4 रोजी, मराठवाड्यात 3 ते 5 अणि विदर्भात 3 ते 6 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे; तर कोकणात त्यातुलनेत कमी पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत पुणे शहर व परिसरात दमदार पावसाची नोंद झाली. यात लोणावळा व चिंचवड भागात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, जिल्ह्यात बारामती वगळता कुठेही मोठा पाऊस झाला नाही. आगामी 48 तासांत घाटमाथ्याला यलो अलर्ट दिल्याने मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

24 तासांतील पाऊस; असे आहेत यलो अलर्ट

3 सप्टेंबर : नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
4 सप्टेंबर : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT