Latest

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे पाणी, वाहतूक संथगतीने

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे पाणी आले आहे. वाहतूक एका बाजूने संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात पाऊस कायम आहे. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ४१ फुटांवर पोहोचली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. (Kolhapur Panchganga water level) दरम्यान, जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात काल गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे खुलेच असून, पावसाने पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. मांडुकलीजवळ पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला आहे. २७ मार्गांवरील एस.टी. सेवा बंद करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT