Latest

राज्यात पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता

अमृता चौगुले

पुणे : आगामी पाच दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, सप्टेंबरची सुरुवात पावसाने होत आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशात उत्तर प्रदेश व राजस्थान वगळता उर्वरित सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात, तर मध्य भारतात पुन्हा पश्चिमी वार्‍याची ताकद वाढल्याने पाऊस पुन्हा सुरू होत आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT